‘पायथन’विषयी विनामूल्य वेबिनार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘पायथन’विषयी विनामूल्य वेबिनार
‘पायथन’विषयी विनामूल्य वेबिनार

‘पायथन’विषयी विनामूल्य वेबिनार

sakal_logo
By

पुणे, ता. २५ : वेब व सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसाठी सोपी व प्रमाणित लँग्वेज असल्याने पायथन हा प्रोग्रॅमिंग बिगिनर्ससाठी परफेक्ट ऑप्शन आहे. पायथन सर्व प्रकारच्या सॉफ्टवेअर सोल्यूशन्ससाठी आयडियल लँग्वेज आहे. मशिन लर्निंग व डेटा सायन्समध्ये वापर होत असल्याने पायथन डेव्हलपर्सना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. याबबत मार्गदर्शन करणारा ऑनलाइन विनामूल्य वेबिनार रविवारी (ता. २) सकाळी दहा वाजता आयोजिला आहे. यामध्ये ‘रिया ऍडव्हायझरी’चे प्रिन्सिपल कन्सल्टन्ट अतुल फड हे मार्गदर्शन करणार आहेत.
संपर्क : ७३५०००१६०३

-------------------------------------------------
सर्व आवृत्त्यांसाठी SIILC च्या लोगोसह वापरावी

ब्रॉयलर पोल्ट्री व्यवसाय मार्गदर्शन
पुणे, ता. २५ : कोट्यवधींची उलाढाल असणारे पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी पक्ष्यांचे व्यवस्थापन, मार्केट स्थिती, मार्केटिंग तसेच करार पद्धत, ब्रॉयलर पोल्ट्रीचे अर्थशास्त्र इ.बाबत जाणून घेणे गरजेचे असते. याबाबत मार्गदर्शन करणारे प्रशिक्षण शनिवारी (ता. १) व रविवारी (ता. २) आयोजिले आहे. यामध्ये पोल्ट्री विषयातील तज्ज्ञ डॉ. माणिक धुमाळ हे मार्गदर्शन करतील. पोल्ट्री उद्योगाची मार्केट डिमांड ओळखून या क्षेत्रात उतरू पाहणारे शेतकरी, युवावर्गासाठी हे प्रशिक्षण फायदेशीर ठरणारे आहे. प्रतिव्यक्ती शुल्क ४५०० रुपये.

शेवगा उत्पादन तंत्र आणि निर्यातीच्या संधी
निर्यातक्षम शेवगा उत्पादन कसे घ्यावे, कोणकोणत्या देशात निर्यातीला संधी आहेत याबाबत सविस्तर मार्गदर्शन करणारी दोन दिवसांची कार्यशाळा शनिवारी (ता. १) व रविवारी (ता. २) आयोजिली आहे. कमी पाण्यात व कोरडवाहू जमिनीत येणाऱ्या शेवगा पिकाची लागवड कशी करावी, शेवग्याच्या वेगवेगळ्या जातींची ओळख, खत व पाणी व्यवस्थापन, छाटणीचे व्यवस्थापन, फुलोरा अवस्था, काढणी व्यवस्थापन, निर्यातीसाठी गुणवत्तेची पडताळणी, निर्यातीसाठी शेंगांचा देठ किती व कसा ठेवावा, रसायन मुक्त उत्पादन, ट्रेसिबिलीटी, निर्यातीसाठी कागदपत्रांची पूर्तता, देशनिहाय निर्यातीचे नियम आदी संदर्भात निर्यातदार तज्ञ मार्गदर्शन करतील. प्रतिव्यक्ती शुल्क ४५०० रुपये.

नावनोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क : ९१४६०३८०३१.
ठिकाण ः सकाळ मीडिया सेंटर, सकाळ नगर गेट क्र. १, बाणेर रस्ता, औंध, पुणे