बाईक टॅक्सीवर व्यापक कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाईक टॅक्सीवर व्यापक कारवाई
बाईक टॅक्सीवर व्यापक कारवाई

बाईक टॅक्सीवर व्यापक कारवाई

sakal_logo
By

पुणे, ता. २५ ः पुण्यात बाईक टॅक्सीविरोधात आरटीओ प्रशासन केवळ गाड्या जप्त करणे एवढ्या पुरतेच मर्यादित कारवाई न करता अधिक व्यापक स्वरूपाची कारवाई करण्याची शक्यता आहे. ज्या कंपनीच्या वतीने सेवा दिले जाते थेट त्यांच्यावर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. यासह अन्य पर्यायावर देखील आता पुणे आरटीओ प्रशासन विचार करीत आहे. मंगळावरपासून आरटीओ व वाहतूक पोलिस एकत्रित बाईक टॅक्सी विरोधात कारवाई करणार आहेत. यावेळी कारवाईचे नेमके स्वरूप स्पष्ट होतील.
गेल्या काही महिन्यांत पुणे शहरांत मोठ्या प्रमाणात बाईक टॅक्सीवर करावी झाली. मात्र ही कारवाई केवळ गाड्या जप्त करणे इतपर्यंतच मर्यादित होती. या कारवाईनंतर सेवा देणाऱ्या बाईक टॅक्सी कंपनीने मर्यादित स्वरूपात सेवा देण्यास सुरवात केली. आता देखील सेवा सुरूच आहे. आरटीओ प्रशासन गाड्या जप्त करून त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यानुसार आर्थिक दंड लावतात. तो दंड भरल्यावर वाहन चालक आपल्या गाड्या सोडवून घेतात. मात्र केवळ गाड्या जप्त न करता थेट कंपन्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी अनेक रिक्षा संघटना करीत होत्या. त्यांच्या मागणीला आता यश येताना दिसून येत आहे.

संघटना-आयुक्त बैठक
पुण्यातील रिक्षा चालक संघटना व परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्यात काही दिवसापूर्वी बैठक झाली. यात विविध मुद्यावर चर्चा झाली. त्यात बाईक टॅक्सीचा मुद्दा देखील चर्चेला आला. यावेळी परिवहन आयुक्तांनी बाईक टॅक्सिविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. अशा कंपन्यांवर थेट गुन्हे दाखल करावा असा आदेश दिले असल्याचे काही रिक्षा चालक संघटनांनी सांगितले.

बाईक टॅक्सी विरोधात आमच्या कारवाईचे स्वरूप व्यापक करणार आहोत. कायद्यात ज्या काही तरतुदी आहेत. त्यानुसार कारवाई केली जाईल. येत्या एक ते दोन दिवसांत कारवाई केली जाईल.
- डॉ अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

अवैध प्रवासी वाहतूक या अंतर्गत आम्ही बाईक टॅक्सी विरोधात कारवाई करणार आहोत. मंगळवारपासून बाईक टॅक्सी विरोधात कारवाई करणार आहोत.
- राहुल श्रीरामे, पोलिस उपायुक्त (वाहतूक), पुणे