Sat, Feb 4, 2023

लष्करातील जवानांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन
लष्करातील जवानांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन
Published on : 25 September 2022, 12:10 pm
पुणे, ता. २५ ः लष्करी वैद्यकीय महाविद्यालय (एएफएमसी) आणि डिफ्रंट स्ट्रोक्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या बुधवारी (ता. २८) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दिवंगत ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून जमा करण्यात येणारे रक्त हे सशस्त्र दलातील जवान तसेच लष्करी रुग्णालयांकरिता एएफएमसीकडे सुपूर्द केले जाणार आहे. हे शिबिर २८ सप्टेंबरला सकाळी साडेनऊ ते दुपारी दोन या वेळेत लॉ कॉलेज रस्ता येथील ‘फिल्म ॲण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ (एफटीआयआय) येथे होणार आहे. तर शहरातील नागरिकांनी यात सहभाग घेत रक्तदान करण्याचे आवाहन एएफएमसी व फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.