Wed, Feb 1, 2023

‘छायाकृती - द लाईट आर्ट’ प्रदर्शन आजपासून
‘छायाकृती - द लाईट आर्ट’ प्रदर्शन आजपासून
Published on : 25 September 2022, 2:28 am
पुणे, ता. २५ ः फोटोआर्टीओ स्कूल ॲाफ फोटोग्राफी आर्ट येथील विद्यार्थ्यांच्या ‘छायाकृती - द लाईट आर्ट’ या फोटोग्राफी प्रदर्शनाचे सोमवारपासून (ता. २६) आयोजन करण्यात आले आहे. बालगंधर्व कलादालन येथे हे प्रदर्शन बुधवारपर्यंत (ता. २८) खुले असणार आहे. फोटोग्राफर विकास शिंदे यांच्या हस्ते सोमवारी (ता. २६) सकाळी १०.३० वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर फोटोग्राफीतील बारकावे, कलात्मकता व टेक्नोलॅाजी या विषयांवर मार्गदर्शन सत्र होणार आहे. मंगळवारी (ता. २७) सायंकाळी ५.३० वाजता सुनील जाधव यांचे प्रिंटिंग या विषयावर मार्गदर्शन सत्र होणार असल्याची माहिती फोटोआर्टीचे संचालक सचिन भोर यांनी दिली.