‘लोकमान्य सोसायटी’कडून मुदत ठेवींच्या व्याजदरात वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘लोकमान्य सोसायटी’कडून
मुदत ठेवींच्या व्याजदरात वाढ
‘लोकमान्य सोसायटी’कडून मुदत ठेवींच्या व्याजदरात वाढ

‘लोकमान्य सोसायटी’कडून मुदत ठेवींच्या व्याजदरात वाढ

sakal_logo
By

पुणे, ता. १९ : ‘लोकमान्य सोसायटी’ने लघु मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकने द्वैमासिक आढावा घेताना गेल्या ४ मे रोजी रेपो दरात वाढ केली आहे. त्याअनुषंगाने सोसायटीने आपल्या लघु मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली असून ती ९ मेपासून केल्या जाणाऱ्या ठेवींवर लागू असेल.

गुंतवणूक योजनांतील ठेवींच्या व्याजदरात केलेल्या वाढीच्या निर्णयानुसार ६ महिने ते १ वर्ष मुदतीसाठी आता असलेल्या व्याजदरात ०.२५ टक्के, १ वर्षे १ दिवस ते २ वर्षांच्या कालावधीसाठी ठेवण्यात येणाऱ्या मुदत ठेवींसाठी ०.३५ टक्क्यांची वाढ केली आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी ०.५० टक्के इतका अधिकचा व्याजदर दिला जातो आहे.

वाढीव व्याजदराचा सभासदांना लाभ घेता येण्यासाठी सोसायटीने काही नवीन ठेव योजनांची घोषणाही केली आहे. दरम्यान, गुंतवणूकदार घरबसल्या ‘डिजिटल प्लॅटफॉर्म’च्या माध्यमातून (www.lokmanyaonline.com) देखील या ठेवा योजनांत पैसे गुंतवू शकतील. सोसायटीच्या कोणत्याही शाखेत किंवा १८०० २१२ ४०५० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून सभासद, गुंतवणूकदारांना यावरील वाढीव व्याजदराचा व नवीन योजनेचा लाभ घेता येईल, असे ‘लोकमान्य सोसायटी’ने स्पष्ट केले आहे.