
वीरमाता, वीरपत्नींचा सन्मान सोहळा
पुणे, ता. २४ ः शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले फाउंडेशनतर्फे हुतात्मा जवानांच्या वीरमाता, वीरपत्नी यांचा सन्मान सोहळा आणि गानसरस्वती लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी २९ जानेवारीला हिंदी सिनेगीतांवर आधारित संगीतरजनीचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम पुणेकरांसाठी खुला आहे. कॅप्टन सुशांत गोडबोले यांना २९ जानेवारी २००३ जम्मू येथे ऑपरेशन पराक्रमदरम्यान वीरमरण आले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांची आई गीता गोडबोले यांनी शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले फाउंडेशनची स्थापना केली आहे. संगीतरजनीचा कार्यक्रम २९ जानेवारीला कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रात्री ९.०० वाजता होईल. त्यात राज्यातील ६ हुतात्म्यांच्या कुटुंबांचा सन्मान होणार आहे. या कार्यक्रमात दिलीप कुमार, देव आनंद आणि राज कपूर यांची गाणे सादर होतील. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि निवृत्ती एअर मार्शल भूषण गोखले उपस्थित राहणार आहेत, अशी महिती गीता गोडबोले आणि कीर्ती रामदास यांनी पत्रकार परिषदेत दिली.