‘सोफोश’मध्ये दोन वर्षांची मुलगी दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘सोफोश’मध्ये दोन वर्षांची मुलगी दाखल
‘सोफोश’मध्ये दोन वर्षांची मुलगी दाखल

‘सोफोश’मध्ये दोन वर्षांची मुलगी दाखल

sakal_logo
By

पुणे, ता. २४ ः सोफोश श्रीवत्स संस्थेत दोन वर्षांच्या साक्षी या मुलीला दाखल करण्यात आले आहे. साक्षी ही १३ मार्च २०२२ ला पुणे रेल्वे स्‍टेशनच्या फलाटावर विनापालक आढळून आली. दरम्यान, बालकल्याण समिती १ च्या आदेशानुसार तिला सोफोश येथे तात्पुरती काळजी व संरक्षणाकरिता दाखल करण्यात आले. साक्षीचे पालक किंवा नातेवाइकांनी ३० दिवसांच्या आत सोफोश संस्थेशी किंवा बाल कल्याण समिती-१ शी संपर्क साधावा. अन्यथा साक्षीची संपूर्ण जबाबदारी संस्थेवर राहील आणि बाल कल्याण समिती-१ यांच्या आदेशानुसार संस्थेतर्फे साक्षीचे पुढील पुनर्वसन करण्यात येईल, असे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले आहे.

संपर्कासाठी
सोफोश, ससून हॉस्पिटल, पुणे किंवा लोहमार्ग पोलिस ठाणे अथवा येरवडा येथील बालकल्याण समिती-१ पुणे.
संपर्क : ०२०-२६१२४६६० किंवा २६१२०७६२
फोटो ः हार्डकॉपी