हडपसर रस्ता परिसरात
अतिक्रमणांची पाहणी

हडपसर रस्ता परिसरात अतिक्रमणांची पाहणी

पुणे, ता. २४ ः हडपसर, सासवड रस्त्यावर, पदपथांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे आहेत. याबरोबरच नादुरुस्त दुभाजकांच्या ठिकाणी अपघातांची शक्‍यता आहे. त्यामुळे तेथील अतिक्रमणे काढण्याबरोबरच दुभाजक, रस्ते दुरुस्ती करण्यावर भर देण्यासाठी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी केली. तसेच तत्काळ कारवाई करण्यावरही भर देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
हडपसर, सासवड रस्त्यावर सकाळी, सायंकाळी ऐन रहदारीच्यावेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या पार्श्वभूमीवर महापालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, पथ विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी आणि अधिकाऱ्यांनी विविध रस्त्यांची पाहणी करून उपाय योजना करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार महापालिकेच्या या अधिकाऱ्यांनी सोमवारी स्वारगेट ते हडपसर, हडपसर ते भेकराईनगर आणि हडपसर ते मगरपट्टा या रस्त्याची पाहणी केली. पाहणी केलेल्या रस्त्यावर जागोजागी रस्ता दुभाजक तोडलेले आणि काढल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. तुटलेल्या दुभाजकांजवळच अतिक्रमणे वाढली आहे, त्यामुळे अपघाताची शक्‍यताही नाकारता येत नाही. त्यामुळे दुभाजक दुरुस्त करण्याबरोबरच पदपथ व रस्त्यावरील अतिक्रमणे काढून वाहने व पादचाऱ्यांची गैरसोय टाळण्यात येणार आहे. याविषयी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे म्हणाले, ‘‘सोलापूर रस्त्यावरील पदपथांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागत असल्याने अतिक्रमण काढून टाकण्यात येत आहेत.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com