जिल्ह्यातील ४० पंप 
दोन दिवसांपासून बंद 

‘ग्रामीण’मधील सीएनजी पंपधारकांचा संप सुरूच

जिल्ह्यातील ४० पंप दोन दिवसांपासून बंद ‘ग्रामीण’मधील सीएनजी पंपधारकांचा संप सुरूच

पुणे, ता. २८ ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सीएनजी गॅसपुरवठा करणाऱ्या पंपचालकांनी शुक्रवारपासून (ता.२७) सुरू केलेला बेमुदत संप दुसऱ्या दिवशीही (शनिवारी) सुरूच आहे. यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ग्राहकांना सीएनजी गॅस मिळणे दोन दिवसांपासून बंद झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील ४० सीएनजी पंप दोन दिवसांपासून बंद आहेत.

दरम्यान, या संपामध्ये पुणे शहरातील सीएनजी पंपचालक सहभागी नाहीत. त्यामुळे शहरातील सीएनजी गॅसचा पुरवठा सुरू असल्याचे आॅल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय प्रवक्ते अली दारूवाला यांनी सांगितले. पुणे शहरातील पंपांद्वारे महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीचा (एमएनजीएल) गॅस पुरवठा करण्यात येतो. एमएनजीएल कंपनीचा गॅस पुरवठा करणारे सर्वच सीएनजी पंप नियमितपणे सुरू आहेत. मात्र, गुजरातमधील टोरंट गॅस कंपनीच्यावतीने पुरवठा करण्यात येत असलेल्या सीएनजी गॅसचे पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ४० पंप संपात सहभागी झाले असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

केंद्र सरकारने २०२१ मध्येच सीएनजी गॅस पुरवठा करणाऱ्या पंपचालकांना सेवामूल्य (कमिशन) देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी एमएनजीएल या गॅस कंपनीकडून करण्यात येत आहे. त्यामुळे या कंपनीच्या सीएनजी पंपचालकांना नियमानुसार सेवामूल्य (कमिशन) मिळत आहे. याउलट टोरंट गॅस पुरवठा करणाऱ्या कंपनीकडून अद्याप या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली नाही. केंद्र सरकारच्या निर्णयानुसार सेवामूल्य (कमिशन) मिळावे, अशी ग्रामीण भागातील सीएनजी पंपचालकांची मागणी आहे. या मागणीसाठी त्यांनी या आधीही संप पुकारला होता. परंतु, त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी मध्यस्थी केली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्‍वासनानुसार त्यावेळी हा संप मागे घेण्यात आला होता.

पुणे शहरातील सर्व सीएनजी पंप सुरू आहेत. केवळ जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ४० सीएनजी पंपचालक या संपात सहभागी झालेले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील सर्व सीएनजी पंप हे मागील दोन दिवसांपासून बंद आहेत.
- अली दारूवाला, राष्ट्रीय प्रवक्ता, ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com