व्यावसायिक मधमाशीपालन व मध प्रक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

व्यावसायिक मधमाशीपालन व मध प्रक्रिया
व्यावसायिक मधमाशीपालन व मध प्रक्रिया

व्यावसायिक मधमाशीपालन व मध प्रक्रिया

sakal_logo
By

पुणे, ता. ३० : मधमाशी पालन केवळ मधासाठी नसून परागीभवनासाठीही आहे. ज्याद्वारे पीक उत्पादन वाढीस मदत होते. अनेक पिकांमध्ये याचे उत्तम परिणाम दिसून आल्याने या व्यवसायात भरपूर वाव आहे. मधमाशीपालन व्यवसाय म्हणून कसा करावा, मध उत्पादन घेण्यापासून ते मधमाशीपालनात उद्योजक कसे व्हावे, याविषयी मार्गदर्शनपर कार्यशाळा ३, ४ व ५ फेब्रुवारी रोजी आयोजिली आहे. ज्यात मधमाशांचे महत्त्व, विविध जाती, जीवनचक्र, वसाहतींचे व्यवस्थापन, मधमाशा हाताळणी, काळजी, मधमाशांपासून मिळणारे उपपदार्थ, मध प्रक्रिया इ.विषयी मधमाश्‍यांच्या संवर्धनात अनेक वर्षांपासूनचा अनुभव असणारे तज्ज्ञ हेमंतकुमार डुंबरे मार्गदर्शन करणार आहेत. तीन दिवसांपैकी एक दिवस संपूर्ण प्रात्यक्षिक घेतले जाणार आहे. प्रतिव्यक्ती शुल्क सहा हजार रुपये. आज नोंदणी केल्यास ५०० रुपये सवलत मिळेल.


व्यावसायिक बंदिस्त शेळी-मेंढी पालन
मटणाचा व्यवसाय करणाऱ्यांना बोकड, मेंढ्या (बोल्हाई) विक्री, जातिवंत बोकड तयार करून त्यांची विक्री असे आर्थिक उत्पन्न वाढविण्याचे विविध पर्याय याद्वारे उपलब्ध होऊ शकतात. या व्यवसायाबाबत माहिती करून देणारी कार्यशाळा ४ व ५ फेब्रुवारी रोजी आयोजिली आहे. यात शेळ्या, मेंढ्यांच्या विविध जाती, निवड, करडांचे व शेळी-मेंढीचे शास्त्रोक्त संगोपन, गोठा व्यवस्थापन, व्यवसायाचे अर्थशास्त्र, आजार व उपाययोजना, लसीकरण, शासकीय योजना व अनुदान इ.विषयांचा समावेश आहे. प्रात्यक्षिक अनुभवासाठी उत्तम व्यवस्थापन असलेल्या शेळी व मेंढी फार्मला शिवार फेरीचे आयोजन आहे. जेवण, चहा प्रमाणपत्रासह प्रतिव्यक्ती शुल्क ४५०० रुपये.
नावनोंदणीसाठी संपर्क ः ९१४६०३८०३१
ठिकाण : सकाळ मीडिया सेंटर, सकाळनगर, गेट नं. १, बाणेर रोड, औंध, पुणे