पाणी आणि सांडपाणी व्यवस्थापन अभ्यासक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाणी आणि सांडपाणी व्यवस्थापन अभ्यासक्रम
पाणी आणि सांडपाणी व्यवस्थापन अभ्यासक्रम

पाणी आणि सांडपाणी व्यवस्थापन अभ्यासक्रम

sakal_logo
By

पुणे, ता. ३१ : पाणी आणि सांडपाणी व्यवस्थापन या विषयवार एआयएसएसएमएस व एपीजी लर्निंग यांच्या संयुक्त विद्यमाने एक विशेष अभ्यासक्रम सोमवारपासून (ता. ६) सुरु होत आहे. योग्य सांडपाणी व्यवस्थापन हे पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्याच्या रक्षणासाठी आवश्यक आहे. शासनासोबतच विविध उद्योग-व्यवसाय यासाठी आता कटिबद्ध होत आहेत. या क्षेत्रात सध्या प्रशिक्षित व कुशल मनुष्यबळाची वानवा असल्याने हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. कमीतकमी दहावी पास व्यक्तीसुद्धा यासाठी पात्र आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क : ७३५०००१६०२

लोगो- एसआयआयएलसी
औषधी, सुगंधी वनस्पती लागवड
पुणे, ता. ३१ : शतावरी, अश्वगंधा, सर्पगंधा या औषधी तसेच लेमनग्रास, तुळस, पचोली, जिरॅनियम या सुगंधी वनस्पतींची लागवड आणि त्यांच्या प्रक्रिया पद्धतीविषयी मार्गदर्शन करणारी कार्यशाळा शनिवारी (ता. ४) आयोजिली आहे. बाजारपेठेच्या मागणीचा अभ्यास करून त्याप्रमाणे लागवड तसेच प्रक्रिया उद्योगांना लागणाऱ्या कच्च्या मालाच्या गरजेनुसार नियोजन केल्यास चांगले आर्थिक उत्पन्न मिळू शकते. प्रतिव्यक्ती शुल्क १७५० रुपये.
नावनोंदणीसाठी संपर्क : ९१४६०३८०३१

शेळी-मेंढीपालन, मधमाशीपालनातील ट्रेंडस
शेती क्षेत्रात नव्याने व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात असणाऱ्यांसाठी ‘कमर्शिअल बंदिस्त शेळी आणि मेंढीपालन’ तसेच आधुनिक मधमाशीपालन या व्यवसायांमधील नवे ट्रेंडस तसेच व्यवसायात असलेल्या संधीबाबत शास्त्रोक्त व सखोल मार्गदर्शन करणाऱ्या कार्यशाळा येत्या विकेंडला पुण्यात आयोजिल्या आहेत. शाश्वत उत्पन्न देणाऱ्या या दोन्ही व्यवसायांत यशस्वी होण्याची सूत्रे, व्यवसाय कसा वाढवावा इ.विषयीचे बारकावे स्वतः या क्षेत्रात १५-२० वर्षांपासून काम करणारे दिग्गज तज्ज्ञ शिवारफेरीत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करणार आहेत. शेळी-मेंढीपालन कार्यशाळा ४ व ५ फेब्रुवारी रोजी तर, आधुनिक मधमाशीपालन कार्यशाळा ३, ४ व ५ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
कार्यशाळा ठिकाण ः एसआयआयएलसी, सकाळनगर, गेट नं. १, बाणेर रोड, औंध, पुणे
नावनोंदणीसाठी संपर्क ः ९१४६०३८०३१