पुणेकरांना उकाड्याची अनुभूती

पुणेकरांना उकाड्याची अनुभूती

पुणे, ता. २ ः शहर आणि परिसरात थंडी कमी झाली असून, किमान तापमानात सरासरीपेक्षा वाढ कायम आहे. दरम्‍यान, पुढील आठवडाभर शहर आणि परिसरात निरभ्र वातावरणाची शक्यता असून तापमानातील चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला.
शहरात गुरुवारी (ता. २) १३.९ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. सरासरीपेक्षा तापमानात २ अंशांनी वाढ कायम होती. यामुळे गारठा कमी आणि दिवसा उकाड्याची काहीशी अनुभूती होत आहे. त्याचबरोबर उपनगरांमध्ये तुरळक ठिकाणी रात्रीच्या वेळी गारठा जाणवू लागला आहे. येत्या बुधवारपर्यंत (ता. ८) शहरात निरभ्र वातावरणाची शक्यता असल्याने तापमान १२ ते १८ अंशांच्यादरम्यान नोंदले जाऊ शकते.
राज्यात ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानातही लक्षणीय वाढ झाल्यामुळे थंडीही ओसरली. मात्रा आता निरभ्र वातावरणाची स्थिती तयार होत असल्याने तापमानात पुन्हा घट होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, शुक्रवारी (ता. ३) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भातही गारठ्याची शक्‍यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.
गुरुवारी (ता. २) राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद गोंदिया येथे १०.५ अंश सेल्सिअस झाली. विदर्भात किमान तापमान सरासरीच्या खाली कायम होते, तर मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी किमान तापमानात सरासरीपेक्षा २ ते ५ अंशांनी वाढ झाली होती. कोकण वगळता उर्वरित राज्यात तापमान १० ते १९ अंशांच्या जवळपास होते. सध्या नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात असलेले कमी दाब क्षेत्र कोमोरीनच्या दिशेने सरकत आहे. यामुळे दक्षिणेकडील केरळ, तमिळनाडू येथे पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान मध्‍य प्रदेश व ओडिशा येथे शुक्रवारी (ता. ३) थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com