प्लॅस्टिक बाटल्या जमा करा अन् मिळवा स्मार्टफोन, इलेक्‍ट्रीक बाईक

प्लॅस्टिक बाटल्या जमा करा अन् मिळवा स्मार्टफोन, इलेक्‍ट्रीक बाईक

पुणे, ता. ३ ः प्लॅस्टिकच्या टाकाऊ बाटल्यांमधून तुम्हाला काय मिळेल, तर आपले उत्तर येईल काहीच नाही. मात्र याच प्लॅस्टिकच्या बाटल्या जमा करून दिल्यानंतर तुम्हाला स्मार्टफोन, स्मार्टवॉच, कॉम्प्युटरपासून ते इलेक्‍ट्रीक बाईक, वाद्यवृंद संच अशी बक्षीसे मिळाली तर? होय, हे खरं आहे. महापालिकेने शहरातील प्लॅस्टिक कचऱ्याच्या संकलनास चालना मिळावी आणि नागरिकांनाही प्लॅस्टिक कचरा संकलनाची सवय लागावी यासाठी खास ‘प्लॅस्टिक कचरा संकलन स्पर्धा’ आयोजिली आहे, त्याअंतर्गत प्लॅस्टिकच्या बाटल्यांचे संकलन करून त्या जमा करणाऱ्या नागरिक, शैक्षणिक व सामाजिक अशा गटांसाठी आकर्षक बक्षिसेही ठेवली आहेत.

काय आहेत अटी?
१) स्पर्धकांनी आपल्या घरातील, कामाच्या ठिकाणातील किंवा इतर सार्वजनिक ठिकाणच्या प्लॅस्टिक बॉटल्स संकलित करायच्या
२) भंगार माल विक्रेते किंवा अन्य कोणाकडूनही प्लॅस्टिकच्या बाटल्या घेऊन जमा करणाऱ्यांना स्पर्धेतून बाद करणार
३) महापालिका किंवा स्वच्छच्या कर्मचाऱ्यांना सहभाग घेता येणार नाही
४) सहभागासाठी ऑनलाइन अर्ज करून प्रवेशिका भरायची
५) वैयक्तीक गटातून सहभागी होणाऱ्या नागरीकांनी ऑनलाइन नोंदणी न करता प्लॅस्टिक बाटल्या कोठीवर देतेवेळी नोंदणी करायची


- स्पर्धेचा कालावधी ः १ ते २८ फेब्रुवारीपर्यंत
- कधी उपक्रम ः दर शनिवारी व रविवारी प्लॅस्टिक बाटल्यांचे संकलन होणार
- व्यवस्था काय ः महापालिकेच्या प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांतर्गतच्या आरोग्य कोठ्यांमध्ये प्लॅस्टिक बाटल्या जमा करणे

गट विभागणी
- वैयक्तिक ः सर्व वयोगटातील नागरिक
- शैक्षणिक संस्था ः शाळा/महाविद्यालये
- संस्थात्मक ः गृहनिर्माण संस्था, व्यावसायिक आस्थापना, स्वयंसेवी संस्था, खासगी संस्था, गणेश मंडळे आदी
- विजेते ः क्षेत्रीय कार्यालय स्तरावर प्रत्येक गटातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे विजेते घोषित होणार

संकलित बाटल्यांचा वापर
- महापालिकेने अधिकृत केलेल्या रिसायक्‍लर्स किंवा प्रोसेसर्सकडे संकलित झालेल्या प्लास्टिकच्या बाटल्या देणार
- त्यामधून आकर्षक म्युरल्स, पेव्हर ब्लॉक्‍स, इंटरलॉकिंग ब्लॉक्‍स इ. साहित्य बनविणार
- त्याचा वापर शहर सौदर्यीकरण किंवा उद्याने, रस्ते, फुटपाथच्या सुशोभीकरणासाठी करणार

शहरातील प्लॅस्टिक कचऱ्याच्या संकलनास चालना मिळावी व नागरीकांना प्लॅस्टिक कचरा संकलनाची सवय लागावी, यासाठी ‘प्लॅस्टिक कचरा संकलन स्पर्धा’ आयोजिली आहे. या स्पर्धेसाठी कमिन्स इंडिया संस्थेचे स्वयंसेवक सहकार्य करणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना स्मार्टफोन, स्मार्टवॉच, इलेक्‍ट्रीक बाईक अशा स्वरूपाची बक्षीसे दिली जाणार आहेत
- कुणाल खेमणार,
अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका

प्लॅस्टिक कचरा संकलन स्पर्धेच्या नावनोंदणीसाठी क्यूआर कोड स्कॅन करा....
या लिंकवर क्‍लिक करून करा नोंदणी ः
https://forms.gle/5jpGJ1hAa3LAiXFB9

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com