एसआयआयएलसी

एसआयआयएलसी

सर्व आवृत्त्यांसाठी SIILC च्या या इमेल सोबत जोडलेल्या लोगोसह वापरावी
रिअल इस्टेट एजंट प्रशिक्षणाचा
गुरुवारी विनामूल्य वेबिनार

पुणे, ता. ५ : महारेराने आता रिअल इस्टेट एजंटना व्यवसाय करण्यासाठी प्रमाणपत्र बाळगणे बंधनकारक केले आहे. प्रमाणपत्रासाठी त्यासाठीचे प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे ‘सकाळ’ व ‘ॲग्रोवन’ संलग्न शैक्षणिक संस्था ‘एसआयआयएलसी’ला या प्रशिक्षणासाठी महारेराकडून अधिकृत प्रशिक्षण संस्था म्हणून मान्यता मिळाली आहे. ऑनलाइन पद्धतीने २० तासांचे हे प्रशिक्षण पूर्ण करून एजंटला प्रमाणपत्र प्राप्त करून घेता येईल. नव्याने एजंटचे रजिस्ट्रेशन करताना किंवा रजिस्ट्रेशनचे नूतनीकरण करताना हे प्रमाणपत्र आता बंधनकारक आहे. महारेराने ठरवून दिलेल्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त डिजिटल मार्केटिंग, वास्तुशास्त्र या विषयांच्या कार्यशाळा या प्रशिक्षणात होणार आहेत. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या एजंटना सकाळमधील जाहिरातींमध्ये सवलत (अटी आणि शर्तींसह) मिळणार आहे. या संदर्भात अधिक माहिती देणारा विनामूल्य वेबिनार गुरुवारी (ता. ९) दुपारी बारा वाजता आयोजित केला आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : ९१३००७०१३२, ७३५०००१६०३.

सर्व आवृत्त्यांसाठी SIILC च्या लोगोसह वापरावी
कमर्शिअल ब्रॉयलर पोल्ट्री फार्मिंग
पुणे, ता. ५ : चिकनसाठीच्या पक्ष्यांच्या (ब्रॉयलर) कमर्शिअल कुक्कुटपालनाविषयी सविस्तर मार्गदर्शन करणारी दोन दिवसीय विशेष कार्यशाळा शनिवारी (ता. ११) व रविवारी (ता. १२) आहे. यात पोल्ट्री फार्मिंग करताना पक्ष्यांचे व्यवस्थापन, मार्केट स्थिती, मार्केटिंग तसेच करार पद्धत, ब्रॉयलर पोल्ट्रीचे अर्थशास्त्र याबाबत सविस्तर मार्गदर्शन होईल. तसेच प्रशिक्षणात ब्रॉयलर (मांसासाठीचे पक्षी) पोल्ट्री उद्योगातील संधी, पक्ष्यांचे खाद्य, आजार, लसीकरण, पोल्ट्रीचे अर्थशास्त्र, मार्केटिंग व्यवस्थापन, बँक फायनान्स, करार पद्धतीने पोल्ट्री फार्मिंग, टेक्नो कमर्शिअल आस्पेक्ट, चिकन प्रक्रिया, चिकन पदार्थांचे मूल्यवर्धन हे विषय शिकायला मिळतील. पोल्ट्री विषयातील दिग्गज तज्ज्ञ व यशस्वी पोल्ट्री व्यावसायिक डॉ. माणिक धुमाळ हे कार्यशाळेला मार्गदर्शन करणार आहेत. या क्षेत्रात उतरू पाहणारे शेतकरी, युवा वर्गासाठी कार्यशाळा फायदेशीर आहे. तसेच यशस्वी पोल्ट्री फार्मला शिवारफेरीचे आयोजन केले आहे. चहा, जेवण, प्रमाणपत्र व शिवारफेरीसह प्रतिव्यक्ती शुल्क चार हजार रुपये.
नावनोंदणीसाठी संपर्क : ९१४६०३८०३१.
ठिकाण : सकाळ मिडीया सेंटर, सकाळ नगर, गेट क्र. १, बाणेर रस्ता, औंध, पुणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com