Mon, March 20, 2023

कारच्या धडकेने निवृत्त नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू
कारच्या धडकेने निवृत्त नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू
Published on : 6 February 2023, 10:58 am
पुणे, ता. ६ : भरधाव कारच्या धडकेने निवृत्त नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना येरवड्यातील शास्त्रीनगर रस्त्यावर घडली. या प्रकरणी एका कारचालक महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रकाशचंद्र लक्ष्मण तेलंग (रा. शास्त्रीनगर, येरवडा) असे मृत्यू झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. तेलंग यांची सून प्रज्ञा (वय ३३) यांनी या संदर्भात येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तेलंग नौदलातून निवृत्त झाले होते. ते रविवारी (ता. ५) सकाळी साडेअकराच्या सुमारास येरवड्यातील शास्त्रीनगर रस्त्याने निघाले होते. त्यावेळी कारने त्यांना धडक दिली. अपघातानंतर जखमी झालेल्या तेलंग यांना कारचालक महिलेने रुग्णालयात दाखल केले.