घरेलू कामगार महिलांचा मोर्चा

पगार वाढण्याची मोलकरीण संघटनेची मागणी

घरेलू कामगार महिलांचा मोर्चा पगार वाढण्याची मोलकरीण संघटनेची मागणी

पुणे, ता. ६ ः हल्ली घरा-घरात धुणे-भांडे किंवा इतर कामांसाठी घरेलू कामगारांची आवश्‍यकता भासते. आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी म्हणून कित्येक गरजू महिला घरेलू कामगार म्हणून काम करत आहेत. पण, वाढत्या महागाईला तोंड देणे या घटकांसाठी आव्हानात्मक ठरत आहे. महागाईने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली असून याचा फटका घरेलू कामगारांनाही मोठ्या प्रमाणात बसला आहे. त्यात या घरेलू कामगारांच्या पगारात ही वाढ होत नसल्याने घराचा खर्च कसा भागवायचा हा प्रश्‍न या कामगार महिलांसमोर निर्माण झाला आहे. या वाढत्या महागाईमुळे मेटाकुटीला आलेल्या घरेलू कामगार महिलांनी मोर्चा काढत ‘आमचा पगार वाढवावा’ अशी मागणी केली आहे.

पुणे शहर मोलकरीण संघटनेच्या वतीने बिबवेवाडी येथे या मोर्चाचे आयोजन करत, या घरेलू कामगारांसाठी पगार वाढ करण्याची मागणी केली. महागाईने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली असून याचा फटका घरेलू कामगारांनाही मोठ्या प्रमाणात बसला आहे. कोरोनाच्या आगीतून उठून महागाईच्या फुफाट्यात या कष्टकरी महिलांचे कुटुंब पोळून निघत आहे. कोरोनाच्या काळात घरेलू कामगारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. घराबाहेर पडता येत नसल्याने त्यांचे उत्पन्न थांबले होते. अनेकांना कर्ज काढून घर चालवावे लागले. आता सर्व काही पूर्वपदावर असले तरी महागाईच्या दणक्याने त्यांच्या रोजच्या जगण्याचा प्रश्‍न अधिक गंभीर होत आहे. धान्य, भाज्या, इंधनाचे वाढते दर आणि त्यात मुलांच्या शिक्षणाचा खर्च या सर्‍व गोष्टींची समस्या निर्माण झाली आहे. त्यात लॉकडाऊनच्या चार महिन्यांचा पगारही या महिलांना मिळाला नाही. शहरात दोन ते तीन लाख घरेलू कामगार असून महागाईच्या समस्येतून त्यांना ही दिलासा मिळावा, यासाठी त्यांची पगार वाढ होणे गरजेचे आहे. वारंवार यासाठी विविध संघटनांकडून प्रयत्न केले जात असले तरी त्यांची पगार वाढ होत नसल्याचे दिसून येत आहे. त्याची दखल घेत पुणे शहर मोलकरीण संघटनेने रविवारी (ता. ५) हा मोर्चा काढला, अशी माहिती संघटनेच्या मेधा थत्ते यांनी पत्रकाद्वारे दिली.

घरेलू कामगार महिलांनी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या काळात नागपूरमध्ये ही मोर्चा काढला होता. तसेच किमान वेतन लागू करणे, कल्याणकारी समितीची स्थापना करणे, घरेलू कामगारांच्या योजनांसाठी १०० कोटी रुपये मंजूर करणे आदी मागण्या करण्यात आल्या होत्या. परंतु, मंत्रिमंडळाने त्यांना कोणतेही ठोस आश्र्वासन दिले नाही, असेही त्यांनी नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com