संस्कृत राज्य नाट्य स्पर्धेत ‘अञ्‍जलिस्थः चन्द्र’ प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संस्कृत राज्य नाट्य स्पर्धेत
‘अञ्‍जलिस्थः चन्द्र’ प्रथम
संस्कृत राज्य नाट्य स्पर्धेत ‘अञ्‍जलिस्थः चन्द्र’ प्रथम

संस्कृत राज्य नाट्य स्पर्धेत ‘अञ्‍जलिस्थः चन्द्र’ प्रथम

sakal_logo
By

पुणे, ता. ६ ः राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ६१ व्या संस्कृत राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत चैत्राली कल्चरल ग्रुप, कोल्हापूरच्या ‘अञ्‍जलिस्थः चन्द्र’ या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. सर्वोत्कृष्ट नाटकासह दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाशयोजना, अभिनय रौप्यपदक या विभागातही या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावत आपला ठसा उमटवला.

सांगली शिक्षण संस्थेच्या ‘श्वासपर्व’ या नाटकाने द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक आणि फर्ग्युसन महाविद्यालय, पुणेच्या ‘यावच्चन्द्रदिवाकरौ’ या नाटकाने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे निकालाची घोषणा केली. यंदा पुणे आणि नाशिक केंद्रावर एकूण २७ संघांनी प्रयोग सादर केले. परीक्षक म्हणून शिवानी कोटीभास्कर, प्रणव चौसाळकर आणि संदीप ढिकले यांनी काम पाहिले.

दिग्दर्शनासाठी बद्रिश कट्टी आणि प्रीतम जोशी, लेखनासाठी वेदांगी रांजणीकर आणि डॉ. प्रभाकर भातखंडे, प्रकाश योजनेसाठी निखिल मारणे आणि अश्विनी करंदीकर, नेपथ्यासाठी डॉ. प्रतिभा कुलकर्णी आणि वेदांगी रांजणीकर, रंगभूषेसाठी मेघना कुंटे आणि शताक्षी पंडित यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला. स्त्रियांच्या विभागातील उत्कृष्ट अभिनयाचे रौप्यपदक संचिता जोशी आणि जान्हवी मुणगेकर यांनी तर पुरुष विभागातील उत्कृष्ट अभिनयाचे रौप्यपदक अभिमन्यू पाठक आणि यश निरलगी यांना जाहीर झाले. सई उभे, सृष्टी करंदीकर, डॉ. दीपलक्ष्मी भट, दीक्षा जगताप, रुचिता पंचभाई, कैवल्य देशमुख, गुरुप्रसाद कार्लेकर, संस्कार धावणे, हरक भारतीया आणि मल्हार प्रभुमिराशी यांना अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे जाहीर झाली.