धंगेकर दाम्पत्याकडे आठ कोटींची मालमत्ता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धंगेकर दाम्पत्याकडे 
आठ कोटींची मालमत्ता
धंगेकर दाम्पत्याकडे आठ कोटींची मालमत्ता

धंगेकर दाम्पत्याकडे आठ कोटींची मालमत्ता

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ६ ः कसबा पेठ विधानसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नीकडे एकूण ८ कोटी ३६ लाख १० हजार रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता आहे. तर धंगेकर यांच्या नावावर ३५ लाख ७३ हजार रुपयांचे कर्ज तर पत्नीच्या नावावर ३२ लाख ८ हजार रुपयांचे कर्ज आहे. धंगेकर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्जासोबत त्यांनी जोडलेल्या शपथपत्रावरून ही माहिती समोर आली आहे.

धंगेकर यांचा शेती व सोने-चांदी कारागिरी आणि बांधकाम हा व्यवसाय आहे. तसेच यांचे शिक्षण आठवीपर्यंत झाले आहे. धंगेकर यांच्या पत्नीकडे ६८ लाख ६७ हजार ३७६ रुपयांची मालमत्ता असून २ कोटी ६० लाख ७२ हजार ९९४ रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. धंगेकर यांच्याकडे दोन दुचाकी, दहा तोळे सोने, तर पत्नीकडे १५ तोळे सोने आहे. धंगेकर यांच्या रविवार पेठ, मंगळवार पेठ, कसबा पेठ आणि शिवाजीनगर येथे सदनिका आहेत. तर यांची दौंड तालुक्‍यातील पिंपळगाव येथे शेती असून कोथरूड येथे साडेचार हजार चौरस फुटांची बिनशेती जागा आहे. यांच्यावर एकूण नऊ प्रलंबित खटले असल्याची माहिती त्यांनी शपथपत्रात दिली आहे.

धंगेकर यांच्याकडील मालमत्तेची स्थिती
- सोने - १० तोळे
- जंगम मालमत्ता - ४७ लाख ६ हजार १२८ रुपये
- स्थावर मालमत्ता - ४ कोटी ५९ लाख २७ हजार ९१६ रुपये
- वार्षिक उत्पन्न - ३ लाख ३६ हजार रुपये