‘झेस्ट-२३’ महोत्सवाचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘झेस्ट-२३’ महोत्सवाचे आयोजन
‘झेस्ट-२३’ महोत्सवाचे आयोजन

‘झेस्ट-२३’ महोत्सवाचे आयोजन

sakal_logo
By

पुणे, ता. ७ ः सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाने आपल्या ‘झेस्ट-२३’ या २१ व्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले आहे. हा महोत्सव ११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान पार पडणार आहे. तसेच या महोत्सवाची यंदाची संकल्पना ‘अनलिश द इन्फिटी’ ही आहे.

ऊर्जा, उत्साह आणि आनंदाने भरलेला सीओईपी टेकचा हा ‘झेस्ट’ हा क्रीडा महोत्सव प्रत्येकाला आवडणारा आहे. आपल्या आजवरच्या प्रवासात ‘झेस्ट’ या महोत्सवाने लोकांची मने जिंकली आहेत. दरम्यान, यंदाच्या महोत्‍सवातील मॅरेथॉन आणि सायक्लेथॉन हे दोन अत्यंत महत्त्वाचे कार्यक्रम झाले. हे दोन्ही कार्यक्रम सामाजिक संदेश देणारे होते व यात ८ वर्षांपासून ते ६५ वर्षांपर्यंत मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला होता. ज्यामध्ये सायक्लोथॉनची संकल्पना ‘गियर टू गो ग्रीन’ तर, ‘अ माईल फॉर स्माइल’ ही मॅरेथॉनची संकल्पना होती. हा महोत्सव देशातील पाचवा सर्वात मोठा क्रीडा महोत्सव म्हणून ओळखला जातो. तसेच यात दरवर्षी देशभरातील १५० हून अधिक महाविद्यालयांतील चार हजाराहून अधिक जण सहभागी होतात.

याठिकाणी नोंदणी करावी
या महोत्सवात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी ‘https://www.coepzest.org/events/’ येथे नोंदणी करावी. असे आवाहन करण्यात आले आहे.