हडपसरमध्ये ट्रकच्या धडकेने दोघांचा मृत्यू

हडपसरमध्ये ट्रकच्या धडकेने दोघांचा मृत्यू

पुणे, ता. ७ : भरधाव ट्रकने धडक दिल्यामुळे रस्त्याच्या कडेला उभारलेल्या दोघांचा मृत्यू झाला. ही घटना हडपसर परिसरात रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला आहे.

संतोष हरपळे (वय ३७, रा. इंदिरा वसाहत, फुरसुंगी) आणि लक्ष्मण पाटील (वय ३५, रा. चंदवाडी, फुरसुंगी) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. याबाबत गणेश चोरघडे (वय ३७, रा. चंदवाडी, फुरसुंगी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून हडपसर पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष आणि लक्ष्मण हे दोघे फुरसुंगीतील जुन्या कालव्याजवळ मांजरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बोलत उभे होते. त्या वेळी दहाचाकी भरधाव ट्रकने दोघांना धडक दिली. त्यात गंभीर जखमी झाल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com