‘एफआआयटीजेईई’च्‍या 
सात विद्यार्थ्यांना १०० गुण

‘एफआआयटीजेईई’च्‍या सात विद्यार्थ्यांना १०० गुण

पुणे ः नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे आयोजित संयुक्त प्रवेश परीक्षेचा (जेईई मुख्य परीक्षा, जानेवारी सेशन) निकाल जाहीर झाला असून, भारतातील इंजिनिअरिंग ट्रेनिंगमधील प्रमुख संस्था ‘एफआयआयटीजेईई’च्या एकूण सात विद्यार्थ्यांनी शंभर गुण मिळविले आहेत. ‘एफआयआयटीजेईई’च्या अमोघ जालान, निपुण गोयल, सोहम दास, अभिजित मजिते, गुलशन कुमार, रिषि कालरा आणि मयांक सोनी यांनी शंभर गुण मिळाले, तर एकूण २४ जणांनी ९९.९९ पेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. ‘एफआयआयटीजेईई’च्या पुणे केंद्रातील १० विद्यार्थ्यांना ९९पेक्षा अधिक गुण मिळाले. यासंदर्भात पुणे केंद्राचे प्रमुख राजेश कर्ण म्हणाले, ‘‘ही संस्थेसाठी अभिमानाची गोष्ट आहे. मी सर्व विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे अभिनंदन करतो. आता आमचे ध्येय जेईईमध्ये (अॅडव्हान्स्ड) चांगले गुण मिळविण्याचे आहे. आमची शिकवण्याची वेगळी पद्धत आणि विद्यार्थ्यांमधील सर्वोत्तम काढून घेण्याच्या हातोटीचे हे यश आहे.’’ या परीक्षेचा दुसरे सेशन ६ ते १२ एप्रिलदरम्यान होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com