मतदान यंत्रांची सरमिसळ

मतदान यंत्रांची सरमिसळ

पुणे, ता. ९ ः कसबा पोटनिवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षक नीरज सेमवाल, एस. सत्यनारायण आणि पोलिस निरीक्षक अश्विनीकुमार सिन्हा यांच्या उपस्थितीत मतदान यंत्रांची प्रथम स्तरीय सरमिसळ (रॅंडमायझेशन) गुरुवारी करण्यात आली. एकूण १ हजार ५८६ बॅलेट युनिट, १ हजार ५३९ कंट्रोल युनिट आणि १ हजार ५४२ व्हीव्हीपॅट यंत्रांची सरमिसळ संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या सरमिसळ प्रक्रियेच्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, उपजिल्हा निवडणूक अधिकारी आरती भोसले, ईव्हीएम व्यवस्थापन समन्वयक अधिकारी सुभाष भागडे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी प्रमोद बोरवले आदींसह उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी आणि निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com