चंदुकाका सराफ अँन्ड सन्‍सची
‘मंथ ऑफ लव्ह’ स्पर्धा

चंदुकाका सराफ अँन्ड सन्‍सची ‘मंथ ऑफ लव्ह’ स्पर्धा

पुणे, ता. १० : ‘जागतिक व्हॅलेंटाइन डे’ निमित्त आपल्या जोडीदाराविषयी वाटणाऱ्या प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी सर्वात मोठा क्षण यानिमित्ताने मिळत असतो. या सुवर्णक्षणांना अजून बहारदार बनविण्‍यासाठी चंदुकाका सराफ अॅण्ड सन्स यांनी अनोख्या ‘मंथ ऑफ लव्ह’ स्पर्धेचे आयोजन प्रथमच केले आहे.
यामध्ये स्पर्धकांनी एक व्हिडिओ तयार करून आपल्या जोडीदाराला पहिल्यांदा कसे व कुठे भेटलो याचा व्हिडिओ गोष्ट स्वरूपात पाठवायचा आहे. यासाठी स्पर्धकांनी चंदुकाका सराफ ॲन्‍ड सन्स प्रा. लि. यांच्या @chandukakasaraf या इन्‍स्टाग्राम पेजला फॉलो करून आपली स्टोरी #MonthOfLove टॅग करायची आहे. हा व्हिडिओ एक मिनिटांपेक्षा जास्त असू नये. व्हिडिओच्या सुरवातीला आपले नाव व लोकेशन सांगावे. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी व्हिडिओ १४ फेब्रुवारीपर्यंत पाठवणे आवश्यक आहे. विजेत्यांची नावे १५ फेब्रुवारी रोजी इन्‍स्टाग्रामवर घोषित करण्यात येतील. तसेच, विजेत्यांना चंदुकाका सराफ अॅण्ड सन्‍स यांच्याकडून आकर्षक डायमंड पेंडंट बक्षिस म्हणून देण्यात येणार आहे, अशी माहिती चंदुकाका सराफ अॅण्ड सन्स यांच्यावतीने देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com