चरस बाळगल्याप्रकरणी सात वर्षे सक्तमजुरी

चरस बाळगल्याप्रकरणी सात वर्षे सक्तमजुरी

पुणे, ता. ११ : चरस बाळगणाऱ्याला सात वर्षे सक्तमजुरी आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा एनडीपीएसचे विशेष न्यायाधीश जे. जी. डोरले यांनी सुनावली. दंड न भरल्यास आरोपीला अतिरिक्त सहा महिने कारावास भोगावा लागणार आहे.
सुरेश गणपती वडत्या (वय ३२, रा. तेलंगण) असे त्याचे नाव आहे. हडपसर, गाडीतळ येथील सार्वजनिक रस्त्यावर आठ ऑगस्ट २०१६ रोजी पोलिसांनी ही कारवाई केली. वडत्याकडून एक किलो ६७५ ग्रॅम वजनाचा चार लाख ८६ हजार रुपये किमतीचा चरस जप्त करण्यात आला होता. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील वामन कोळी यांनी सात साक्षीदार तपासले. शिक्षेसाठी जप्त केलेला तो अमली पदार्थच आहे, हे सिद्ध करणारा रासायनिक तपासणी अहवाल आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराची साक्ष महत्त्वाची ठरली. हा गुन्हा खुनापेक्षा गंभीर स्वरूपाचा आहे. शैक्षणिक हब आणि सांस्कृतिक राजधानी असलेल्या शहरात बाहेरून अनेक तरुण येतात. झटपट पैसे कमविण्यासाठी तरुण अशा गुन्ह्यात सहभागी झाल्यास समाजावर विपरीत परिणाम होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे समाजात योग्य संदेश जाण्यासाठी अशा गुन्ह्यात कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे, असा युक्तिवाद ॲड. कोळी यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com