Fri, June 2, 2023

किशोर देवधर निधन वार्ता
किशोर देवधर निधन वार्ता
Published on : 13 February 2023, 2:10 am
किशोर देवधर
पुणे ः ज्येष्ठ पत्रकार किशोर देवधर (वय ७४) यांचे निधन झाले. केसरी, तरुण भारत, मुंबई सकाळ व महाराष्ट्र हेरॉल्ड या वृत्तपत्रात त्यांनी काम केले होते, तसेच मराठी ब्लिटझचे काही काळ ते संपादक होते. ‘एकमेव चौकार’ हे पाक्षिक चालविण्यातही त्यांचा मोठा हातभार होता. गेली कित्येक वर्षे ते ‘सकाळ साप्ताहिक’मध्ये शब्दकोडे देत होते. पुणे श्रमिक पत्रकार संघाचे ते अध्यक्षही होते. त्यांच्या पश्चात दोन मुली व नातवंडे असा परिवार आहे.
फोटो ः A24443