निवडणूक निरीक्षकांची मतदान केंद्रांना भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निवडणूक निरीक्षकांची 
मतदान केंद्रांना भेट
निवडणूक निरीक्षकांची मतदान केंद्रांना भेट

निवडणूक निरीक्षकांची मतदान केंद्रांना भेट

sakal_logo
By

पुणे, ता. १३ : कसबा पेठ विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून नियुक्त करण्यात आलेले निवडणूक निरीक्षक नीरज सेमवाल यांनी या मतदारसंघातील महात्मा फुले पेठ येथील कै. केशवराव जेधे मनपा शाळा क्र. १६, सावित्रीबाई फुले प्रशाला आणि शुक्रवार पेठ येथील आदर्श विद्यालय या मतदान केंद्रांना भेट देऊन तपासणी केली. सेमवाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना मतदान सुरळीतपणे पार पडण्यासाठी आवश्यक सुविधा आणि रचना याबाबत मार्गदर्शन केले. या वेळी कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे पर्यवेक्षकीय अधिकारी दिनेश शिंदे व स्वाती देवकर उपस्थित होते.