धमकावून मुलाकडून 
पैसे उकळणाऱ्यास अटक

धमकावून मुलाकडून पैसे उकळणाऱ्यास अटक

पुणे, ता. १३ : ‘मी मोठा गुन्हेगार असून, आताच जेलमधून बाहेर आलो आहे. पैसे न दिल्यास तुला पळवून जीवे ठार मारेन’, अशी धमकी देत एका चालकाने अल्पवयीन मुलाकडून पैसे उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार ऑक्टोबर २०२२ ते १० फेब्रुवारी २०२३ या कालावधीत घडला. यासंदर्भात सॅलिसबरी पार्क येथील एका ३८ वर्षीय नागरिकाने स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सागर श्रवण पवार (वय २८, रा. राजीव गांधीनगर) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर पवार हा फिर्यादी यांच्या शेजारच्या सोसायटीमधील एका रहिवाशाकडे चालक म्हणून कामास होता. त्याने फिर्यादीच्या १४ वर्षाच्या मुलासोबत ओळख निर्माण केली. घरातून पैसे आणून न दिल्यास तुला पळवून जीवे ठार मारेन, अशी तो मुलाला सतत धमकी देत होता. त्याला घाबरुन मुलाने घरातील ४५ हजार रुपये आणून दिले होते. त्यानंतर १० फेब्रुवारीला रात्री फिर्यादीचा मुलगा पार्किंगमध्ये खेळत होता. त्यावेळी पवार याने पुन्हा मुलाला धमकी देऊन घरातून २५ हजार रुपये घेऊन न आल्यास जीवे मारुन टाकेन, अशी धमकी दिली. हा प्रकार फिर्यादी यांना समजल्यानंतर त्यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com