मराठी भाषा गौरव दिनी नाविन्यपूर्ण उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मराठी भाषा गौरव दिनी
नाविन्यपूर्ण उपक्रम
मराठी भाषा गौरव दिनी नाविन्यपूर्ण उपक्रम

मराठी भाषा गौरव दिनी नाविन्यपूर्ण उपक्रम

sakal_logo
By

पुणे, ता. १४ ः कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी म्हणजे २७ फेब्रुवारीला दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. यंदाही मराठी भाषिकांनी हा दिन अभिनव उपक्रमांनी साजरा करत मराठीच्या प्रचार-प्रसाराला साहाय्य करावे, असे आवाहन विविध साहित्य संस्थांच्या प्रतिनिधींनी पत्रकार परिषदेद्वारे केले.

याप्रसंगी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे, स्टोरीटेल मराठीचे प्रसाद मिरासदार आदी उपस्थित होते. प्रा. जोशी म्हणाले, ‘‘यंदाच्या मराठी भाषा गौरव दिनी पारंपरिक उपक्रमांसह नावीन्यपूर्ण उपक्रम राबवावे, असे आवाहन करत आहोत. यानिमित्त प्रत्येकाने किमान एक तरी पुस्तक, ऑडिओबुक किंवा ई-बुक विकत घेऊन आप्तांना भेटस्वरूप द्यावे. मराठी भाषेतील आर्थिक व्यवहार वाढण्यास यांमुळे मदत होईल. याद्वारे लेखक, प्रकाशक, अभिवाचक अशा सर्वच घटकांना प्रोत्साहन मिळेल.’’

‘या भेटीची छायाचित्रे व मजकूर समाजमाध्यमावरून प्रसिद्ध केल्यास या संकल्पनेचा प्रसार होऊ शकेल. अधिकाधिक मराठी भाषिकांनी यात सहभागी व्हावे’, असे आवाहन मिरासदार यांनी केले.