अनिरुद्ध देशपांडे यांच्या कार्यालय, निवासस्थानाची तपासणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनिरुद्ध देशपांडे यांच्या कार्यालय, 
निवासस्थानाची तपासणी
अनिरुद्ध देशपांडे यांच्या कार्यालय, निवासस्थानाची तपासणी

अनिरुद्ध देशपांडे यांच्या कार्यालय, निवासस्थानाची तपासणी

sakal_logo
By

पुणे, ता. १५ : बांधकाम व्यावसायिक अनिरुद्ध देशपांडे यांचे कार्यालय आणि निवासस्थानाचा बुधवारी प्राप्तीकर विभागाकडून तपास करण्यात आला. देशपांडे यांच्यासह विभागाने शहरात एकूण सहा ठिकाणी तपास केला.
देशपांडे हे ‘सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक आहेत. ‘लवासा’ या प्रकल्पात देशपांडे यांचादेखील सहभाग होता. या कारवाईत विभागाच्या पथकाने काही कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक साधने जप्त केली आहेत. आर्थिक गैरव्यवहाराच्या संशयावरून विभागाने हा केल्याची माहिती समोर आली आहे. देशपांडे यांच्या सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीचे डेक्कन जिमखाना भागात कार्यालय आहे, तर हडपसर भागातील अमानोरा पार्क परिसरात दुसरे कार्यालय आहे. सिटी कॉर्पोरेशनमार्फत पुण्यात अनेक रहिवासी आणि व्यावसायिक जागांचे बांधकाम प्रकल्प निर्माण करण्यात आले आहेत.
या कारवाईत प्राप्तीकर विभागाच्या दिल्ली आणि मुंबईतील अधिकाऱ्यांचे पथक सहभागी झाले होते. बुधवारी पहाटेपासूनच ही कारवाई सुरू करण्यात आली होती. देशपांडे यांचा प्राप्तिकर भागाकडून तपास झाल्यामुळे पुण्यातील उद्योग विश्वात खळबळ निर्माण झाली आहे. याबाबत देशपांडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो होऊ शकला नाही.