
‘टेब’चे आयुर्वेदिक उपचार सांधेदुखीवर उपयुक्त
पुणे, ता. १५ : सांधेदुखीच्या वेदनेतून मुक्ती मिळवून पुन्हा ठणठणीत होण्यासाठी ‘टेब ट्रीटमेंट क्लिनिक्स’चे शुद्ध आयुर्वेदिक उपचार सांधेदुखीवर कायमची मात करण्यासाठी नागरिकांना उपयुक्त ठरू शकतील, असे प्रतिपादन ‘टेब’कडून करण्यात आले आहे.
सांधेदुखीच्या त्रासातून कायमची आणि लवकरात लवकर सुटका व्हावी, यासाठी संशोधन करून प्रत्येकासाठी स्वतंत्र आणि अनोखी उपचारपद्धती ‘टेब ट्रीटमेंट क्लिनिक्स’ने विकसित केली आहे. या उपचारपद्धतीची सुरुवात १९९१ मध्ये झाली. डॉ. टेब आणि डॉ. रुस्तम बी. जिनवाला यांनी पुण्यात ‘टेब ट्रीटमेंट क्लिनिक’ ची स्थापना केली. संधिवात आणि सांधेदुखी दूर करण्यासाठी डॉ. जिनवाला यांनी ही उपचारपद्धती शोधली. त्यांनी १९८७ मध्ये ‘एफडीए’कडून परवाना मिळवला. गेल्या जवळपास ३७ वर्षांपासून पुण्यातील ढोले पाटील रस्त्याला ‘टेब ट्रीटमेंट क्लिनिक’ची शाखा आहे. डॉ. मंजूषा अवस्थी यांच्या नेतृत्वाखाली ‘टेब ट्रीटमेंट क्लिनिक्स, पुणे’ शाखा कार्यरत आहे.
सांध्याचे दुखणे, आमवात, संधीवात, गुडघेदुखी, मणक्याचे आजार, स्पाँडिलायसिस अशा सर्व प्रकारच्या स्नायूंशी संबंधित आजारांवर ‘टेब ट्रीटमेंट क्लिनिक्स’मध्ये उपचार होतात. ते करताना रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती, पचनशक्ती, त्याची शारीरिक-मानसिक स्थिती याही गोष्टी लक्षात घेतल्या जातात. त्यानंतरच स्वतंत्रपणे प्रत्येक रुग्णाचे औषध तयार केले जाते. उपचार सुरू करतानाच ‘टेब ट्रीटमेंट क्लिनिक्स’चे तज्ज्ञ डॉक्टर किती कालावधीत पूर्णतः बरे होणार, हे लेखी स्वरूपात लिहून देतात. शिवाय उपचारांसाठी किती खर्च येईल, हेही अगोदरच सांगतात. ‘टेब ट्रीटमेंट क्लिनिक्स’मध्ये उपचार ओपीडी बेसिस पद्धतीने घेता येतात. दोन महिन्यातून एकदा रुग्णाला ‘टेब ट्रीटमेंट क्लिनिक्स’ मध्ये यावे लागते. रविवारी आणि सायंकाळनंतरही क्लिनिक सुरू असते. ‘टेब ट्रीटमेंट क्लिनिक्स’ आठवड्यातील सातही दिवस सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत सुरू असतात. मात्र येथे अपॉइंटमेंट घेऊन यावे लागते.