बँकेची १८ कोटी रुपयांची फसवणूक

बँकेची १८ कोटी रुपयांची फसवणूक

पुणे, ता. १५ : डेअरी फर्मच्या नावाखाली कर्ज घेत ते स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वापरत कोटक महिंद्रा बँकेची १८ कोटी ४६ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरोधात यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
महेश लक्ष्मणदास दोशी, मनाली मंगेश दोशी आणि मिलिंद लक्ष्मणदास दोशी असे आरोपींची नावे आहेत. याबाबत बँकेचे मुख्य अधिकारी दुष्यंतसिंह देवेंद्रसिंह झाला (वय ४०, रा. येरवडा) यांनी फिर्याद दिली. १५ डिसेंबर २०१५ ते २७ ऑगस्ट २०२२ दरम्यान हा प्रकार घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींची एल. व्ही. डेअरी पाटस नावाची भागीदारी फर्म आहे. आरोपींनी संगनमत व कट कारस्थान करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बँकेस खोटी माहिती व बनावट कागदपत्रे तयार करून त्या आधारे १८ कोटी ४६ लाख दोन हजार ३८७ रुपयांचे कर्ज घेतले. हे कर्ज व्यावसायिक कामांसाठी न वापरता बँकेची फसवणूक केली. फर्मचे भागीदार मंगेश दोशी यांचे निधन झाल्यानंतर मनाली दोशी यांचे नाव भागीदार म्हणून समाविष्ट केले आहे. आरोपींनी कर्ज मिळण्यासाठी प्लॅन्ट आणि मशिनरी बुक डेब्टस स्टॉक हायपोथिकेट तारण ठेवले होते. मात्र बँकेच्या अधिकाऱ्यांनी फर्मला भेट दिल्यानंतर तारण रकमेच्या स्टॉक आढळून आल्या नाही, असे तक्रारीत नमूद आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com