‘एलन’च्या आठ विद्यार्थ्यांना
९९.९ पेक्षा जास्त पर्सेंटाईल

‘एलन’च्या आठ विद्यार्थ्यांना ९९.९ पेक्षा जास्त पर्सेंटाईल

पुणे, ता. १६ : देशातील सर्वांत मोठ्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा असणाऱ्या ‘जेईई मेन २०२३’च्या जानेवारी सत्राचा निकाल नॅशनल टेस्टिंग एजन्सीने नुकताच जाहीर केला. या निकालात एलन करिअर इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेडच्या पुण्याच्या आठ विद्यार्थ्यांनी ९९.९ पर्सेंटाईल गुण मिळविले आहेत.
एलन पुणे केंद्राचे प्रमुख अरुण जैन म्हणाले, ‘‘जानेवारीच्या सत्रात झालेल्या जेईई-मेन परीक्षेत संस्थेच्या पुण्यातील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. ५२ विद्यार्थ्यांनी ९९ पर्सेंटाईलपेक्षा जास्त, १४२ विद्यार्थ्यांनी ९५ टक्के आणि त्याहून अधिक, तर २०९ विद्यार्थ्यांनी ९० टक्के आणि त्याहून अधिक गुण मिळवले आहेत. संस्थेची शिकविण्याची रणनीती विद्यार्थ्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. एलन स्ट्रॅटेजी, विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यामुळे हे यश मिळत आहे.’’
संस्थेचे अध्यक्ष डॉ. ब्रिजेश माहेश्वरी म्हणाले, ‘‘एलनच्या दोन हजार ७३ विद्यार्थ्यांनी ९९ पर्सेंटाईलपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. यामध्ये ३६ जणांनी ९९.९९ पर्सेंटाईल, तर २६३ विद्यार्थ्यांनी ९९.९ पर्सेंटाईल मिळविले आहेत. एलनच्या आठ विद्यार्थ्यांनी एकूण १०० पर्सेंटाईल मिळविले आहेत. यामध्ये एलन क्लासरूमचे विद्यार्थी कौशल विजयवर्गीय, देशांक प्रताप सिंग, हर्षुल संजय भाई, सोहम दास, दिव्यांश हेमेंद्र शिंदे आणि क्रिश गुप्ता यांचा समावेश आहे. यासोबतच अभिनित मजते आणि मयंक सोनी हे विद्यार्थी दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून एलनशी संबंधित आहेत, त्यांनी एकूण १०० टक्के गुण मिळविले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com