दरोड्याच्या तयारी असलेली टोळी जेरबंद

दरोड्याच्या तयारी असलेली टोळी जेरबंद

पुणे, ता. १६ : कोंढवा रस्त्यावर असलेल्या धर्मावत पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून घातक शस्त्रे जप्त करण्यात आली आहे. या टोळीत दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. यामध्ये चौघांना अटक केली आहे. महेश गजेसिंह (वय २८), रितेश खरात (वय २७), माधव अंकुशे (वय २२), महेंद्र पाटील (वय २४) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस अंमलदार लक्ष्मण होळकर यांनी याबाबत तक्रार दिली आहे. महेश व माधव पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. दरम्यान, कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक हद्दीत गस्त घालत असताना त्यांना काहीजण पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने या टोळीला पकडले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com