मतदान केंद्रांची निरीक्षकांकडून तपासणी

मतदान केंद्रांची निरीक्षकांकडून तपासणी

पुणे, ता. १६ : कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे निवडणूक निरीक्षक नीरज सेमवाल यांनी मतदारसंघातील ३४ मतदान केंद्रांची एकाच दिवसात तपासणी केली.

सेनादत्त पेठ येथील शारदा विद्यालय व वसंतराव वैद्य विद्यालय, महात्मा फुले पेठ येथील आनंदीबाई कर्वे शाळा, सदाशिव पेठेतील सर्जेराव साळवे मनपा शाळा, एसपीएम शाळा, रुईया मूकबधिर विद्यालय, बुधवार पेठ येथील नूमवि प्राथमिक शाळा, शेठ हिरालाल प्रशाला, प्रार्थना समाज मंदिर आणि संत नामदेव कार्यालय येथील ३४ मतदान केंद्रांना भेट देऊन तपासणी केली. त्यांच्यासमवेत विधानसभा मतदारसंघांचे पर्यवेक्षकीय अधिकारी दिनेश शिंदे व स्वाती देवकर आदी उपस्थित होते.

मतदान सुरळीत पार पडण्यासाठी केंद्रांवरील सुविधा, व्यवस्थापन आणि रचना याबाबत संबंधित मतदान केंद्रांचे समन्वयक यांना सूचना आणि मार्गदर्शन दिले. या वेळी मनपा शाळा क्र. १६ ब केशवराव जेधे शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती मानकर उपस्थित होत्या.

२५१८६

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com