Mon, March 27, 2023

सिंहगड रस्त्यावर महिलेचे मंगळसूत्र हिसकावले
सिंहगड रस्त्यावर महिलेचे मंगळसूत्र हिसकावले
Published on : 17 February 2023, 3:40 am
पुणे, ता. १७ : सिंहगड रस्त्यावर सोनसाखळी चोरट्याने एका पादचारी महिलेच्या गळ्यातील एक लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसका मारून चोरले. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात ५० वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यावरून अनोळखी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी (ता. १५) ही घटना घडली. तक्रारदार या आनंदनगर परिसरात राहण्यास आहेत. त्या भाजी खरेदीसाठी माणिकबागेत आल्या होत्या. भाजी खरेदीनंतर त्या सिंहगड रस्त्यावरून चालत निघाल्या असता पाठीमागून आलेल्या एका चोरट्याने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले.