Wed, June 7, 2023

टोळक्याचा तरुणावर लोखंडी हत्याराने हल्ला
टोळक्याचा तरुणावर लोखंडी हत्याराने हल्ला
Published on : 17 February 2023, 4:53 am
पुणे, ता. १७ : जुन्या भांडणातून पाच जणांच्या टोळक्याने तरुणावर लोखंडी हत्याराने हल्ला केल्याची घटना सय्यदनगर भागात घडली. या प्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात यश सुनील ससाणे (वय २२) यांनी तक्रार दिली आहे. त्यानूसार फैजान शेख ऊर्फ पच्चीस याच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी (ता. १५) दुपारी ही घटना घडली आहे.
या घटनेत यश ससाणे हा गंभीररित्या जखमी झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यश व आरोपींची ओळख आहे. यशचा मित्र गुफरान ऊर्फ गुफ्या यांच्यात जुने वाद आहेत. या वादातून टोळक्याने यश हा दुपारी परिसरात थांबला असता लोखंडी हत्याराने त्याच्यावर वार केले. त्यानंतर टोळके तेथून पसार झाले.