Thur, June 8, 2023

आचार्य विनोबा भावे प्रशालेकडून मतदान जागृती
आचार्य विनोबा भावे प्रशालेकडून मतदान जागृती
Published on : 17 February 2023, 5:03 am
पुणे, ता. १७ : गंज पेठ येथील आचार्य विनोबा भावे प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी फेरी काढून मतदान जनजागृती केली. ‘हे आहे पुणे...मतदानाला पडू नका उणे..!’, ‘आपले मत आपला अधिकार..!’, ‘आपले मतदान लोकशाहीची शान!’ अशा घोषणा देत विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी जनजागृती फेरी काढली. कसबा पेठ नोडल अधिकारी रेवती शाळीग्राम यांनी भावीमतदारांना मतदानाचे महत्त्व, मतदान कसे करतात याविषयी माहिती दिली. २६ फेब्रुवारीला मतदान जागृतीचे आवाहन केले. या फेरीचे नेतृत्व सुशांत खिलारे यांनी केले. कसबा पेठ कार्यालयाच्या जनजागृती वाहनाने मतदार गीत ऐकवत व एलसीडी स्क्रीनवर छायाचित्रांचे सादरीकरण केले. या वेळी अधिकारी गणेश सपार, कल्पेश गायकवाड आदी उपस्थित होते.
PNE23T25411