Sun, March 26, 2023

शिवाजी महाराजांच्या थ्री डी चित्रांचे प्रदर्शन
शिवाजी महाराजांच्या थ्री डी चित्रांचे प्रदर्शन
Published on : 18 February 2023, 12:12 pm
पुणे, ता. १८ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवरायांच्या जीवनातील प्रसंगावर आधारित त्रिमितीय चित्रांचे प्रदर्शन रविवारी (ता. १९) बावधन येथील सृजन कॉलेज ऑफ डिझाईनच्या आवारात आयोजिले आहे. सकाळी साडेनऊ ते सायंकाळी पाच या वेळात हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहे. अपराजिता सोसायटी आणि सृजन कॉलेज ऑफ डिझाइनच्या वतीने हे प्रदर्शन आयोजित केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मापासून १०० प्रसंगावर आधारित महाविद्यालयातील चित्रे विद्यार्थ्यांनी तयार केली आहेत, अशी माहिती ‘सृजन’चे संचालक अंशूल रासकर यांनी दिली.