पुनर्विकासासाठी सोसायट्यांना मिळणार ठोस उपाय

पुनर्विकासासाठी सोसायट्यांना मिळणार ठोस उपाय

(आवश्यक निरोप )


पुणे, ता. १८ः आमच्या सोसायटी समोरचा रस्ता सहा मीटरचा आहे, मग त्याच्या रिडेव्हलपमेंटचे कसे होईल? आमच्या सोसायटीने सल्लागाराकडून करून घेतलेल्या फिजिबिलीटी रिपोर्टमधील गोष्टी आम्हाला क्रॉस चेक करता येतील का...? अशा वेळी सोसायटीकडे सल्लागारांना देण्यासाठीचे मोठे शुल्क उपलब्ध होतेच असे नाही... अशा एक ना अनेक गोष्टी आहेत, ज्या सोसायटी रिडेव्हलपमेंटमध्ये अडचणीच्या वाटतात. यासाठी सोसायट्यांना मार्गदर्शन खूप आवश्यक असते.

ही गरज लक्षात घेऊन गृहनिर्माण सहकारी सोसायट्यांच्या पुनर्विकास प्रक्रियेला अधिक गती मिळावी या उद्देशाने ‘सकाळ’ माध्यम समूहातर्फे ‘सकाळ रिडेव्हलपमेंट फोरम’ हा विशेष उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत सोसायटी पुनर्विकासाच्या प्रक्रियेसाठी गृहनिर्माण सोसायट्यांना, सभासदांना मदत केली जाणार आहे. ‘सकाळ रिडेव्हलपमेंट फोरम’ उपक्रमांतर्गत वास्तुविशारद विकास अचलकर व मनोज तातुसकर, कायदेतज्ज्ञ अॅड. नितीन सरदेसाई तसेच वित्तीय संस्थांशी संबंधित बँक अधिकारी हे सोसायटी, पदाधिकारी व सभासदांना पुनर्विकासासाठी योग्य ती सर्व मदत करणार आहेत.

मेट्रो सिटी गतीने विस्तारत असताना दुसरीकडे मुख्य शहरातील पुनर्विकास प्रक्रिया खूप गतीने होत आहे. शहर विकास अभ्यासकांच्या मते सुमारे ९ ते १० हजार गृहनिर्माण सोसायटी अशा आहेत, ज्यांचा पुनर्विकास होणे अपेक्षित आहे.मात्र या सोसायट्यांना आर्थिक, तांत्रिक, कायदेशीर व अशा विविध अडचणींचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळे काही वेळा ही पुनर्विकासाची प्रक्रिया ठप्प झाल्यासारखी स्थिती असते. पुणे महानगरातील प्रमुख व मागणी असणाऱ्या लोकप्रिय उपनगरांतील सोसायट्यांचा पुनर्विकासाचा निर्माण झालेला असा गुंता सोडविण्याच्या दिशेने आवश्यक ते सर्व मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत सोसायट्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे.

युडीपीसीआर व टीओडी धोरणानुसार गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासाची प्रक्रिया कशी राबवता येईल...? त्याचे फायदे कोणते? ती प्रक्रिया करताना कोणती काळजी घ्यावी या विषयीची विस्ताराने माहिती देण्याबरोबरच सोसायटी, पदाधिकारी व सभासदांच्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न देखील या उपक्रमात केला जाणार आहे. सोसायटीचे सभासद, पदाधिकाऱ्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा व नव्या नियमांची व धोरणांची माहिती करून घ्यावी व सोसायटीच्या पुनर्विकासासाठी पुढे यावे, असे आवाहन ‘सकाळ’ तर्फे करण्यात आले आहे.


नोंदणी आवश्यक
(क्यू आर कोड घेणे)

‘सकाळ रिडेव्हलपमेंट फोरम’ उपक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी आवश्यक आहे. नोंदणीच्या वेळी सोसायट्यांनी पुनर्विकासासाठी सोसायट्यांकडे उपलब्ध कागदपत्रांची माहिती देणे आवश्यक आहे. त्यासोबत या बातमीसोबत असलेला क्युआर कोड स्कॅन करून स्कॅन लिंकमधून उघडणाऱ्या फॉर्ममधील आवश्यक ती माहिती भरणे अपेक्षित आहे. तसेच सोसायटीची संबंधित कागदपत्रे व पुनर्विकासासंबंधी सोसायटीचे प्रश्न लिहून दैनिक सकाळ, नरवीर तानाजीवाडी, साखर संकुलाशेजारी, शिवाजीनगर इथे सील बंद लिफाफ्यात आणून द्यावयाची आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com