पुणे विद्यापीठात ज्येष्ठ नागरिकांचे शिबिर उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे विद्यापीठात ज्येष्ठ नागरिकांचे शिबिर उत्साहात
पुणे विद्यापीठात ज्येष्ठ नागरिकांचे शिबिर उत्साहात

पुणे विद्यापीठात ज्येष्ठ नागरिकांचे शिबिर उत्साहात

sakal_logo
By

पुणे, ता. १८ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘सुखद जीनन संध्या’ या विषयावर शिबिर आयोजित करण्यात आले होते. विद्यापीठात २००८ पासून ज्येष्ठ नागरिक कक्षाची स्थापना बहिशाल शिक्षण मंडळात झाली आहे. तेव्हापासून विद्यापीठाद्वारे ज्येष्ठ नागरिकांसाठी महाविद्यालय व विद्यापीठ परिसरात शिबिरांचे व संत गाडगेबाबा व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते.
बुधवारी (ता. १५) लोणावळा येथील मनशक्ती प्रयोग केंद्राच्या सहायाने ज्येष्ठ नागरिकांसाठी हे शिबिर घेण्यात आले. यामध्ये पुण्यातील शंभर ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. शिबिराच्या उद्‌घाटनप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे यांनी शिबिरांमध्ये ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांच्या सहभागावर भर देण्याकडे लक्ष वेधले. यावेळी प्रमोदभाई शिंदे यांनी सुखी जीवनाविषयी मार्गदर्शन केले. तर मयूर चंदने यांनी ध्यानाचे मानसिक, शारीरिक आरोग्यावरील महत्त्व सांगितले. प्रा.डॉ. गीता शिंदे, डॉ. वर्षा तोडमल, डॉ. तेजनिवळीकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यापुढेही अशी शिबिरे व कार्यशाळा घेण्यात येतील असे बहिशाल शिक्षण मंडळ व ज्येष्ठ नागरिक सहायता कक्षाचे मानद संचालक डॉ. हरीश नवले यांनी सांगितले.