महाशिवरात्रीनिमित्त शिवशंकराला नृत्यातून नमन

महाशिवरात्रीनिमित्त शिवशंकराला नृत्यातून नमन

पुणे, ता. १८ : आद्य नृत्यदेवता मानल्या जाणाऱ्या नटराजरुपी शिवशंकराला महाशिवरात्रीनिमित्त नृत्यातून नमन करण्यात आले. भरतनाट्यम आणि कथक नृत्यातून सादर केलेल्या शिवस्तुती, शिवतांडव आदींना रसिकांची दाद मिळाली. निमित्त होते, भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित ‘शिवार्पणम्’ या नृत्य कार्यक्रमाचे.

नृत्यगुरू अनुजा बाठे यांची संकल्पना असलेला हा कार्यक्रम शिवांजली डान्स अॅकॅडमीने सादर केला. कार्यक्रमाच्या प्रारंभी नृत्य पुष्पांजली सादर करण्यात आली. सृष्टी हिरवे यांनी शंकराला वंदन करत ‘महादेव शिव शंभो’ ही रचना सादर केली. अनुश्री कृष्णन यांनी सादर केलेल्या ‘शिवपंचाक्षर स्तोत्र’ या रचनेला दाद मिळाली. त्यानंतर युक्ता जोशी यांनी शिवतांडव स्तोत्र अत्यंत प्रभावीपणे सादर केले. उडुपीवरून आलेल्या साई अन्नपूर्णी सुधाकर यांनी आपल्या नृत्यातून जालंधर कथा सादर केली. नम्रता पाटील आणि केया शाह यांनी शिव ध्रुपद सादर केले. तन्वी बापट यांनी शिव पदम आणि अथर्व कुलकर्णी या युवा भरतनाट्यम कलाकाराने पारंपारिक ‘शिव कोटुकम्’ सादर केले. अर्धनारीनटेश्वर स्तोत्राच्या सादरीकरणालाही चांगला प्रतिसाद मिळाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com