दिव्यांगांचा नाट्याविष्कार पाहण्याची संधी

दिव्यांगांचा नाट्याविष्कार पाहण्याची संधी

पुणे, ता. १९ ः दिव्यांग चिमुकल्यांनी आपल्या शारीरिक मर्यादांवर मात करत आणि इच्छाशक्तीच्या जोरावर उभा केलेला अनोखा नाट्याविष्कार बघण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. निमित्त आहे, राज्य सरकारतर्फे आयोजित दिव्यांग राज्य बालनाट्य स्पर्धेचे. यंदा ही स्पर्धा पुण्यात रंगणार आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित राज्य नाट्य स्पर्धांमध्ये चार वर्षांपूर्वी दिव्यांग बालनाट्य स्पर्धेचाही समावेश केला. तेव्हापासून या स्पर्धेचे नियमित आयोजन केले जाते. यंदा २७ व २८ फेब्रुवारीला पुण्यात ही स्पर्धा पार पडणार आहे. घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे स्पर्धेतील सर्व नाट्यप्रयोग सादर केले जातील. यंदाच्या स्पर्धेसाठी राज्यभरातून एकूण १९ संघांच्या प्रवेशिका आल्या आहेत. मुंबई, नाशिक, नागपूर, अमरावती, सोलापूर, सांगली, बीड आदी शहरातील नाट्यसंस्था व शाळांची नाटके यात सादर होणार आहेत. स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षकांना विनामूल्य प्रवेश असून दिव्यांग चिमुकल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अधिकाधिक संख्येने रसिकांनी नाट्यगृहात हजेरी लावावी, असे आवाहन स्पर्धेच्या पुणे केंद्राचे समन्वयक राहुल लामखडे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com