महायुतीच्या विजयाची कसब्यातुन होणार सुरवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महायुतीच्या विजयाची कसब्यातुन होणार सुरवात
महायुतीच्या विजयाची कसब्यातुन होणार सुरवात

महायुतीच्या विजयाची कसब्यातुन होणार सुरवात

sakal_logo
By

पुणे, ता. १८ ः कसबा पोटनिवडणुकीमध्ये सर्व मित्रपक्ष एकजुटीने व भक्कमपणे भाजप उमेदवाराच्या पाठीशी उभे आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या दोनशेहून अधिक जागांवर विजय होणार असून त्याची सुरवात कसबा विधानसभा पोटनिवडणुकीद्वारे होईल, असा विश्‍वास भाजपच्या मित्रपक्षांनी व्यक्त केला आहे.
रिपब्लिकन (आठवले गट) पक्ष, शिवसेना (शिंदे गट), शिवसंग्राम, लोकजनशक्ती पार्टी या राजकीय पक्षांसह पतित पावन संघटना आदी भाजपच्या मित्रपक्ष व संघटनांकडून कसबा पोटनिवडणुकीसाठी पक्षाचे उमेदवार हेमंत रासने यांच्यासाठी प्रचारावर लक्ष केंद्रित केले आहे.
रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे समाजातील गरिबांचा विचार करीत असल्यामुळे पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत गेल्या तीन वर्षात ८१ कोटी लोकांना रेशनवर मोफत धान्य मिळू शकले. आत्तापर्यंत लोहियानगर, दत्तवाडी, दांडेकर पूल व कसबा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत १० हजार घरांमध्ये आम्ही पोचलो आहोत.’’

शिवसंग्राम पक्षाचे शहराध्यक्ष भरत लगड म्हणाले, ‘‘पक्षाचे संस्थापक दिवंगत विनायक मेटे यांची मराठा समाजाला न्याय देण्याची आग्रही भूमिका होती. त्यांच्या या भूमिकेला भाजपने प्रामाणिक साथ दिली. शिवसेना-भाजप युतीचे सरकार असताना विनायक मेटे यांनी मराठा समाजाच्या विकासासाठी अण्णासाहेब पाटील मागासवर्गीय महामंडळाची स्थापना केली.’’
लोकजनशक्ती पार्टीचे संजय आल्हाट म्हणाले, ‘‘भाजपची गरिबांच्या कल्याणाप्रतीची आस्था ही केवळ बोलण्यापुरती मर्यादित नाही, तर प्रत्यक्षात कृतीत उतरताना दिसलेली आहे. त्यामुळेच आम्ही भाजपाच्या पाठीशी खंबीरपणाने उभे आहोत.’’

पतित पावन संघटनेचे शहराध्यक्ष स्वप्नील नाईक म्हणाले, ‘‘मोदी सरकार आल्यापासून हिंदुत्वाच्या मुद्याला प्राधान्य दिल्याने तरुणाईला त्याबद्दल अप्रूप आहे. रासने हे गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते असल्यामुळे ते भविष्यात गणेश मंडळांच्या समस्येसाठी न्याय देतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे.’’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदारसंघाच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित करून भाजप उमेदवाराला मदत करण्याचे आदेश दिले आहेत. हिंदुत्व व बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर श्रद्धा असलेला प्रत्येक शिवसैनिक पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरलेला आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे स्वतः आम्हाला मार्गदर्शन करीत आहेत.
- नाना भानगिरे,
शहरप्रमुख, शिवसेना