Tue, March 21, 2023

शहांकडून बापट यांच्या तब्येतीची विचारपूस
शहांकडून बापट यांच्या तब्येतीची विचारपूस
Published on : 18 February 2023, 5:50 am
पुणे, ता. १८ : विविध कार्यक्रमांसाठी शनिवारी पुणे दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रात्री साडेदहाच्या सुमारास घोले रस्त्यावरील महात्मा फुले संग्रहालय येथे जाऊन खासदार गिरीश बापट यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. ‘‘तब्येतीची काळजी घ्या, लवकर बरे व्हा, दिल्लीला या आणि कामाला सुरुवात करा,’’ असे या वेळी शहा त्यांना म्हणाले. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.