Sun, March 26, 2023

टेक्नोव्हेशन प्रदर्शनातील विजेत्यांचा सन्मान
टेक्नोव्हेशन प्रदर्शनातील विजेत्यांचा सन्मान
Published on : 19 February 2023, 10:45 am
पुणे, ता. १९ ः शासकीय अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांच्या ‘टेक्नोव्हेशन २०२३’ या विशेष विज्ञान तंत्रज्ञान प्रदर्शनाला शनिवारी चांगला प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनात अंबोलीच्या आदर्श विद्यालयाने प्रथम क्रमांक तर बेलेवाडीच्या आनंदराव पाटील प्रशालेने द्वितीय क्रमांक पटकाविला. तृतीय क्रमांकाने राजापूर हायस्कूलला गौरविण्यात आले. हिरकणी विद्यालय गावडेवाडीने उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला. प्रथम क्रमांक प्राप्त आदर्श विद्यालयाने स्मार्ट बुजगावणे हा प्रकल्प सादर केला होता.
इयत्ता आठवी ते दहावीचे ३६ शाळांमधील विद्यार्थी यात सहभागी झाले होते. सेंटर फॉर टेक्नॉलॉजी अल्टरनेटीव्हज फॉर रूरल एरियाज, आयआयटी मुंबईचे डॉ. आनंद राव, अटल इनोव्हेशन मिशनचे (नीती आयोग) प्रतीक देशमुख यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले.