Fri, June 9, 2023

वासुदेव कामत यांना शिवशक्ती पुरस्कार प्रदान
वासुदेव कामत यांना शिवशक्ती पुरस्कार प्रदान
Published on : 19 February 2023, 1:49 am
पुणे, ता. १९ : प्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत यांना बाळासाहेब दाभेकर यांच्या हस्ते शिवशक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच गायक साईराम आय्यर, अभिनेत्री संस्कृती बालगुडे यांनाही यावेळी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. दरम्यान, विनायक रामपुरे, विवेक खटावकर आदी कलाकारांचा सत्कार झाला. या कार्यक्रमात साईराम आय्यर यांनी हिंदी, मराठी अनेक युगलगीते स्त्री व पुरुष अशा दोन्ही आवाजात हुबेहूब म्हणून उपस्थितांची दाद मिळवली. या प्रसंगी निरंजन दाभेकर, मिलिंद कुलकर्णी, संदीप पाटील आदी उपस्थित होते.