दानपेटीतील रक्कम चोरणारा अटकेत

दानपेटीतील रक्कम चोरणारा अटकेत

पुणे, ता. १९ : रेंजहिल्स परिसरात असलेल्या श्रीकृष्ण मंदिरातील दानपेटी फोडून रोकड चोरणाऱ्याला खडकी पोलिसांनी अटक केली आहे. जसराज ऊर्फ चंक्या वासुदेवन मन्नू (वय २३, रा. खडकी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. खडकीतील रेंजहिल्स भागात असलेल्या श्रीकृष्ण मंदिरातील दानपेटी फोडल्याची घटना घडली होती. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास करण्यात येत होता. या भागातील एका गॅरेजमध्ये काम करणारा जसराज हा घटना घडल्यानंतर पसार झाला होता. त्याने चोरी केल्याचा संशय पोलिसांना होता. त्यामुळे पोलिस त्याचा शोध घेत होते. तो रेंजहिल्स भागात आल्याची माहिती तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक वैभव मगदूम यांच्या पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com