सहायक आयुक्त लाच घेताना ‘एसीबी’च्या जाळ्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सहायक आयुक्त लाच घेताना ‘एसीबी’च्या जाळ्यात
सहायक आयुक्त लाच घेताना ‘एसीबी’च्या जाळ्यात

सहायक आयुक्त लाच घेताना ‘एसीबी’च्या जाळ्यात

sakal_logo
By

पुणे, ता. २० : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अन्न व औषध प्रशासन विभागात छापा टाकून एका सहायक आयुक्ताला १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडले. सोमवारी (ता. २०) ही कारवाई केली.
साहेब एकनाथराव देसाई, असे ताब्यात घेतलेल्या सहायक आयुक्ताचे नाव आहे. याबाबत एका ५४ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त श्रीहरी पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यक्तीने लॅक्टोज विक्रीच्या परवान्यासाठी कंपनीमार्फत अन्न व औषध प्रशासन विभागाकडे अर्ज केला होता. परंतु, हा अर्ज मंजूर करण्यासाठी अन्न विभागाचे सहायक आयुक्त साहेब देसाई याने तक्रारदाराकडे १० हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात संपर्क साधला. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी औंध येथील अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयात छापा टाकला. त्यावेळी देसाई याला १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना ताब्यात घेतले. पुढील तपास पोलिस निरीक्षक भारत साळुंखे करीत आहेत.

येथे करा संपर्क
सरकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लाचेची मागणी केल्यास प्रशासकीय इमारतीमधील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी केले आहे.
तक्रार करण्यासाठी संपर्क क्रमांक -
हेल्पलाइन टोल फ्री १०६४
दूरध्वनी क्रमांक- ०२०- २६१२२१३४, २६१३२८०२
व्हॉटस॒ॲप क्रमांक- ७८७५३३३३३३