Tue, March 28, 2023

सहा मार्चपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश
सहा मार्चपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश
Published on : 20 February 2023, 5:17 am
पुणे, ता. २० : पुणे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी २१ फेब्रुवारीपासून येत्या सहा मार्चपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. त्यानुसार पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना जमाव करण्यास तसेच पोलिस आयुक्तांच्या परवानगीशिवाय सभा घेण्यास आणि मिरवणूक काढण्यास बंदी राहील.
विशेष शाखेचे उपायुक्त आर. राजा यांनी याबाबत आदेश सोमवारी (ता. २०) जारी केले आहेत. त्यानुसार वरिष्ठांच्या आदेशानुसार शासकीय कर्तव्यावरील व्यक्ती वगळता इतरांना शस्त्र बाळगण्यास मनाई असेल. आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती शिक्षेस पात्र राहील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.