
सोसायटी पुनर्विकासासाठी लक्षणीय प्रतिसाद
पुणे, ता. २१ ः कोथरूड, कर्वेनगर, प्रभात रस्ता, मॉडेल कॉलनी, सहकारनगर, जुन्या पुणे शहरातील मागणी असणाऱ्या अशा विविध उपनगरांत पुनर्विकासाच्या प्रक्रियेने गती घेतली आहे. यात आपल्या सोसायटीने सहभागी व्हावे, आपल्या सोसायटीचाही पुनर्विकास व्हावा, यासाठी अनेकजण प्रयत्नशील आहेत; मात्र कायदेशीर, तांत्रिक समस्यांचे अडथळे सोडविणार कसे.? हा गुंता सोडविण्यासाठी ‘सकाळ माध्यम समुहा’ने सुरू केलेल्या ‘सकाळ रिडेव्हपलपमेंट फोरम’ व ‘रावेतकर ग्रुप’च्या संयुक्त विद्यमाने ‘पुनर्विकास ः नवे वर्ष-नवे पर्व’ या विशेष परिसंवादाचे आयोजन केले आहे.
या परिसंवादात वास्तुविशारद विकास अचलकर व मनोज तातुसकर, कायदेतज्ज्ञ ॲड. नितीन सरदेसाई हे सर्व सोसायटी पदाधिकारी व सभासदांशी संवाद साधतील व उपस्थितांच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. यासाठी ‘सकाळ रिडेव्हपलपमेंट फोरम’ने केलेल्या आवाहनाला पुणेकरांनी सकारात्मक प्रतिसाद देत लक्षणीय संख्येने गृहनिर्माण सहकारी सोसायट्यांनी नोंदणी केली आहे. अनेक सोसायट्यांना पुनर्विकासाचा गुंता सोडविण्याच्या दिशेने सकारात्मक पावले टाकायची आहेत. त्याअनुषंगानेच ठोस चर्चा, मार्गदर्शन व उपाय गृहनिर्माण सोसायट्यांना या परिसंवादात उपलब्ध होणार आहे. या परिसंवादाचा लाभ घेता यावा, यासाठी गुरुवारपर्यंत (ता. २३) नोंदणीसाठी सोसायट्यांना संधी दिली आहे.
नव्या नियमांची माहिती मिळणार
पुनर्विकास प्रक्रियेत युडीसीपीआर व टीओडीच्या नव्या धोरणांमुळे अनेक सवलती उपलब्ध झाल्या आहेत. मात्र, आपल्या सोसायटीसाठी त्यातील नेमक्या कोणत्या तरतुदींचा लाभ घेता येणार, त्यातून पुनर्विकासाची प्रक्रिया सुसह्य होणार आहे, हे नोंदणी केलेल्या सोसायटी पदाधिकाऱ्यांना अधिक नेमकेपणाने कळू शकणार आहे. ग्राहकांना आज अनेकविध समस्यांचा सामना करावा लागतो. तेव्हा सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी या परिसंवादात सहभागी होऊन नव्या नियमांची व धोरणांची माहिती करून घ्यावी व सोसायटीच्या पुनर्विकासासाठी पुढे येण्याचे आवाहन ‘सकाळ’ व रावेतकर ग्रुपने केले आहे.
परिसंवादाविषयी...
- परिसंवादात सहभागासाठी नोंदणी आवश्यक
- उपस्थित राहणाऱ्या पदाधिकाऱ्यांची संख्या देणे
- सोसायट्यांनी पुनर्विकासासंबंधी सोसायटीकडे असलेली कागदपत्रांची यादी जोडणे
- सोसायटीची संबंधित कागदपत्रे व पुनर्विकासासंबंधी सोसायटीचे प्रश्न लिहून दैनिक सकाळ, नरवीर तानाजीवाडी, साखर संकुलाशेजारी, शिवाजीनगर इथे सील बंद लिफाफ्यात आणून द्यावयाची आहेत.
अशी करा नोंदणी...
परिसंवाद नोंदणीसाठी सोसायट्यांनी सोबतचा क्युआर कोड स्कॅन करून त्यातून ओपन झालेल्या लिंकवर उपलब्ध झालेला फॉर्म भरून नोंदणी करावी.
परिसंवादाचा विषय ः ‘सोसायटी पुनर्विकास...नवे वर्ष- नवे पर्व’
कुठे ः पंडित फॉर्म, म्हात्रे पूल, डीपी रस्ता, कर्वेनगर
केव्हा ः शुक्रवार (ता. २४ फेब्रुवारी २०२३ः
कधी ः सायंकाळी ६ ते रात्री ८